Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: बरडवस्ती / Taluka: श्रीरामपूर / Shrirampur District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वयः ७० व्यवसाय ःशेती थोडी होती. घरची परिस्थितीः परिस्थिती हालाखीची आहे पण उत्साह फार. जन्मभर मजुरी करण्यात गेला. अजुनही मजुरी करतात.मी पुष्कळ ओव्या देईन म्हणाल्या. लोकाची दळण दळून देऊन पोट भरल आहे. आता म्हातारपणामुळे पार काठीवर आल्या आहेत. या गंगागीर महाराजांच्या शिष्या आहेत. त्यांच्याच मठात उतरल्या होत्या. गंगागीर महाराजांची दिक्षा घ्यायची म्हणजे बाबा माळ देतात. राम कृष्ण हरी मंत्र देतात.दिक्षाघेतल्यावर ते सांगतात की चांगले त्या दिंडीबरोबर चालत येतात. पण दर्शन मिळावे म्हणून पुढे आल्या. त्यांना पुष्कळ ओव्या येत होत्या. ओव्या देण्याचा उत्साह पण मोठा होता. सायंकाळी परत ओव्या घेण्यासाठी गेलो तर हरीपाठ चालू होता व त्या नुकत्याच गोपाळपूरला जाऊन आल्या होत्या. तिथला माणूस त्यांना ओरडला की उशीरा आलात आणि आता ही जात्यावरली गाणी देत बसलात. त्या उलट म्हणाल्या की मी माझ्या मनाप्रमाणे करणार. ही माझी गाणी आहेत. मी देणार. मठात राहू दीले नाही तर मी रस्त्यावर राहीन. मला हाल सोसायची सवय आहे. मग त्या आम्हाला म्हणाल्या की मला फक्त दोन रूपयांची साखर आणून द्या मग मी चहा पिते अन् ओव्या सांगते. चहा पिऊन जरा ताज्या तवान्या होऊन पुष्कळ ओव्या सांगीतल्या. त्यांनी आग्रहाने त्यांच्या घरी बोलावले आहे. म्हणाल्या या ओव्या छापून मला नाही पाठवल्या तर मग बघा मी तुमच्या घरी पुण्याला येऊन घेऊन जाईन. त्यांनी पार पोष्टाचा पत्ता दिला, पोस्टमनचे नाव व जात सांगीतली. म्हणाल्या की आता तुमचे पत्र व छापलेल्या ओव्या मला नक्की मिळतील. मग त्यांनी पासलकरला एक कोडे घातले. व त्याचे उत्तर पण सांगीतले. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली. | ||