Cast: तेली / Teli Village: / Taluka: वैजापूर / Vaijapur District: औरंगाबाद / Aurangabad Gender: F | वयः ६५ मुलगा ः नाही मुलीः ४ सवाष्ण व्यवसाय ः शेती आहे थोडी. चारही मुलींना १२ वी पर्यंत शिकवले आहे. तीन मुलींची लग्न झाली आहेत. मुलींचे चांगले आहे. या गंगागीर महाराजांच्या शिष्या आहेत. त्यांच्याच मठात उतरल्या होत्या. गंगागीर महाराजांची दिक्षा घ्यायची म्हणजे बाबा माळ देतात. राम कृष्ण हरी मंत्र देतात.दिक्षाघेतल्यावर ते सांगतात की चांगले वागायचे, मनात शुध्द विचार आणायचे, एकादशीचा उपास करायचा, वारी करायची. आता परवा एक कार्यकर्ता आला होता तो म्हणाला की तुम्हाला भजन म्हणता येते तर आपण त्याचा गट करून बचत गट तयार करू. त्या नंतर बोलणे झाले नाही. मी इकडे पंढरपुरलाच आले. त्या दिंडीबरोबर चालत येतात. पण दर्शन मिळावे म्हणून पुढे आल्या. त्यांना पुष्कळ ओव्या येत होत्या. ओव्या देण्याचा उत्साह पण मोठा होता. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली. | ||