Cast: मराठा / Maratha Village: शिंदी / Shindi Taluka: गंगापुर / Gangapur District: औरंगाबाद / Aurangabad Gender: F | वयः६० मुलगेः २ मुलगी ः १ सवाष्ण घरची परिस्थितीः परिस्थिती गरीबीची आहे. मजुरी करावी लागते. एक मुलगा वेडा झाला आहे. तो ३० वर्षाचा आहे. त्याचे लग्न झाले आहे. त्याला चार मुले आहेत. पुष्कळ उपाय केले. आता पुण्याच्या वेड्यांच्या इस्पितळात ठेवले आहे. याबाईंचे म्हणणे की आमच्या जवळ असला की वेडयासारखे करतो. इस्पितळात अजून भेटायला गेल्या नाहीत. या गंगागीर महाराजांच्या शिष्या आहेत. त्यांच्याच मठात त्या राहील्या होत्या. दळणाचा सराव होता म्हणून पुष्कळ गाणी लक्षात आहेत. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली. | ||