Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मोशी / Moshi District: अमरावती / Amravati Gender: F | वयः ६५ मुलगेः २ मुलीः ४ व्यवसाय ः शेती थोडी कोरडवाहु, मजुरी करावी लागते. घरची परिस्थितीः हलाकीची आहे. पुष्कळ सासुरवास काढला. जात्यावर दळण दळलय म्हणून गाणी लक्षात आहेत. मन या जात्याच्या दगडापाशीच रिकाम करायच. दुसर कोण होत ऐकुन घ्यायला. जनावाई गांजरे आणि या मैत्रिणी आहेत. यांचा आवाज चांगला. त्यांना विचारले की रात्री टेप घेऊन येऊ का तर म्हणाल्या तेवढ मात्र करू नका. इथे महाराजांच्या जवळ जाऊन काही पण सांगणआरे आहेत. महाराज म्हणतील की भक्ती सोडून हे काय करत बसलात. आम्ही त्यांच्या बरोबर आलो आहोत. त्यावर जनाबाई व मीरावाई आढावू म्हणाल्या की महाराज कशाला रागावतील. आपल्या मनातील गाणी दिली तर त्यात रागावण्यासारखे काय आहे. फार तर आपण जसे आता रस्त्यावर बसलो आहोत तसे बसू म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. रात्री गाणी टेप करायला गेलो त्या वेळी त्यांना जनाबाईंनी यायला सांगितले पण त्या आल्या नाहीत. विधवा या गुलावराव महाराजांच्या दिंडीत होत्या. त्यांना पंढरपुरला यायला एक महीना लागला. त्या संत जनावाई शाळेत उतरल्या होत्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||