Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: अचलपुर / Achalpur District: अमरावती / Amravati Gender: F | वयः ६० मुलगे ः ४ मुलगी ः नाही व्यवसाय ः शेती ६ एकर कोरडवाहु, मजुरी करावी लागते. घरची परिस्थितीः पुष्कळ सासुरवास काढला. जात्यावर दळण दळलय म्हणून गाणी लक्षात आहेत. एका मुलाचा पानाचा ठेला आहे. दोन मुलगे अॉटो रिक्षा चालवतात. एक घरीच असतो. या गुलावराव महाराजांच्या दिंडीत होत्या. त्यांना पंढरपुरला यायला एक महीना लागला. त्या संत जनावाई शाळेत उतरल्या होत्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||