Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: उदगीर / Udgir District: लातुर / Latur Gender: F | वयः ६० मुलगेः ४ मुलीः ५ व्यवसाय ः शेती .३० एकर बागायत शेती आहे. बाजरी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, भुईमुग, करडी ही पिके होतात. घरची परिस्थितीः एक मुलगा मुंबईत एल.एल.बी झाला आहे, वडील पोलीस पाटील होते. त्यांना रझाकारांच्या काळात मारले. वडलांची पहीली बायको मेली. मग यांच्या आईशी लग्न झाले. या दोघी बहीणी व एक भाऊ. यांच्या सख्या भावाला सावत्र भावाने वीष घालून मारले. सावत्र भावाला चुलत्याची फूस होती. माहेरी गरीबी होती. दुष्काळाच्या काळात चिचोके खाऊन दिवस काढले. बहीण व यांना नहाण आल (त्यांचा शब्द आम्ही शहाण्या झाल्यावर) जरा बरे दिवस आले. साखर चहाच काय तो विकत आणायचा. यांची आई अनवाणी पायानी वारी करायची. ती डोक्यावर तुळस घेऊन जायची. कितीही कष्टाचे दिवस असले, दुष्काळ असला तरी आईनी वारी चुकवली नाही. ती वारली त्या सालीच फक्त तिची वारी चुकली. तिचा वारसा चालवायचा म्हणून आम्ही दोघी बहीणी वारी करतो अस व्दारकाबाईंच म्हणण आहे. यांची बहीण व्दारकाबाई गणपत बिरादार, बेलसिकरग, ता. उदगीर, जि. लातुर यापण वरीत याच दिंडीत असतात. पूर्वी पुष्कळ दळण दळल आहे त्यामुळे गाणी येतात. गिरण्या येण्या आगोदर सारखा दळायचा सराव होता. गणगोतावरच्या असोत, शेती पोतावरच्या असोत वा देवाच्या असोत गाणी भरपूर लक्षात आहेत. १५व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पायी पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. त्यांची मुलाखत व ओव्या १५ तारखेस घेतल्या. त्या निवृत्तीमहाराज राजुरकरांच्या दिंडीत येतात. त्या संभाजी पुलापासल्या खंडुजीबाबा मंदीरात उतरल्या होत्या. | ||