Cast: मराठा / Maratha Village: इटकूर / Itkur Taluka: कळंब / Kalamb District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ५० शिक्षण ः नाही मुलगे ः २ मुलीः ३ व्यवसाय ःशेती थोडी आहे. शेतमजुरी करावी लागते. घरची परिस्थितीः अार्थिक परिस्थिति नाजुक आहे. या आता दासखेड, ता. पाटोदा. जि. बीड येथे रहातात यांचे म्हणणे आहे की यांना कोणीतरी करणी केली. त्यामुळे डोके चक्कर झाले. दासखेडला एकट्याच येऊन राहील्या आहेत.मजुरी करून खातात. नवर्याने दुसरे लग्न केले नाही आहे. जात्यावरल्या ओव्या सांगीतल्या त्यामुळे मनाला शांत वाटले असे म्हणाल्या. या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली ह दिंडीला रू३०० भरावे लागतात. ते नाहीत. मग दिंडीचा स्वैपाक करून दिंडीत सामील झाल्या. दिंडीत मजुरी करून पैसे फेडतात. स्वैपाक करायचा असल्याने या ट्रकमधून जातात. पायी जात नाहीत | ||