Cast: देशमुख / Deshmukh Village: / Taluka: हवेली / Haveli District: पुणे / Pune Valley: हवेली / Haveli Gender: F | वयः७० शिक्षण नाही मुलगा ः नाही मुलीः ३ व्यवसाय ः शेती. घरची परिस्थितीः मुलगा नसल्याने त्यांना फार वाईट वाटते.त्या मुळच्या केसनंदच्या. यांना मुलगा नसल्याने त्यांची जमीन त्यांच्या पुतण्यांकडे आहे. त्या आता थोरल्या मुलीकडे कोरेगाव भीमा येथे रहातात. मुली सगळ्या चांगल्या ठिकाणी आहेत. त्या म्हणाल्या की निदान मुली सगळ्या चांगल्या घरी आहेत याच मला समाधान आहे. त्या म्हणाल्या की आता मुलींना गाण्याचा नाद नाही. त्या नुसत्या टी.व्ही. समोर बसतात. पूर्वी आम्हाला एकमेकींच्या चाली ऐकायला, लक्षात ठेवायला हौस वाटायची. तो उत्साह आता वाटत नाही. सर्वच बाबतीत हे खरे आहे. स्वैपाकाची चव असो, शेतीतले काम असो त्यात कुणी मन घालत नाही. करायच म्हणून करतात. त्यांना जात्यावरील ओव्या सांगायला उत्साह वाटत होता, पण नुसते जात्या शिवाय बसले तर गाणी आठवत नाहीत हा त्यांचा अनुभव. शिवाय विधवापण आले त्यामुळे गाणे म्हणावे वाटत नव्हते. त्यांना मी म्हणाले की जात्यावरल्या ओव्या सांगा तर ओवी शब्द त्यांना ठाऊक नव्हता. त्या आपल्या मुलीला म्हणाल्या की बघ ग यांना काय लागत ते. मग मीच म्हणाले की गाणी द्या. तेंव्हा त्यांना उलगडा झाला. सर्व साधारणपणे जात्यावरची गाणी असे वापरतात. यांना आम्ही ८.१.२००१ ला यांना भेटलो. विधवा | ||