Warning: Undefined variable $performer_picture_url in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 318
Cast: ढोर कंकय्या / Dor Kankayya Warning: Undefined variable $village_devanagari in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Warning: Undefined variable $village in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Village: / Taluka: मानवत / Manvat District: परभणी / Parbhani Gender: F Songs by Nandure Gangu (115) | वयः ४५ मुलगेः ४ मुली ः २ व्यवसायः मजुरी करून जगतात. नवरा गटई काम करतो. गटई काम म्हणजे कातडे कमावणे. थोरल्या मलाचे लग्न झाले. तो सासुरवाडी रहातो. त्यांच्या शब्दात तो त्यांचाच झालाय. त्याच्या कडे चांद्याच्या देवीचा डबा आहे. डबा याचा अर्थ एका डब्यात देवीची मुर्त असते. परडी रेणुका, यल्लमा, तुळजाभवानी यांची असते. परडी आली, डबा आला असा वाक् प्रचार वापरतात. याचा अर्थ देवीने आज्ञा केली म्हणन तिची भक्ती करायची. त्याचे पुष्कळ विधी असतात.त्यांच्या अंगात देवी येते. देवरूसपणा करतात. ज्यांना अठरा अठरा वर्षे मुले नव्हती त्यांना ती यांच्या देवरूसपणाच्या उपायांनी झाली असे यांनी सांगीतले. मुसलमानाच्या बाया पण यांच्याकडे सल्ला मागण्यास येतात. यांना खूप गाणी येतात. ओव्यांव्यतिरिक्त देवीची गाणी, आणी, कहाण्या वगैरे पण येते. त्यांनी त्यांच्या समाजावर कथा सांगितली. मंडनमिश्र म्हणून जैन धर्माचा माणूस होता. त्याने सरस्वतीला वश केले होते. तो लोकांना काहीही करून दाखवत होता. त्याने सगळे ग्रंथ दाबून टाकले होते. शंकरांनी शंकराचार्य म्हणून अवतार घेतला. वयाच्या पाचव्या वर्षी आई बापाची आज्ञा घेईन तो मंडनमिश्राकडे गेला. शंकराचार्याला सातशे शिष्य होते. अलीकडच्या गावात त्याने दुसर्या कासाराला भिक्षा मागितली. कासार म्हणाला आमच्या कडे फक्त काचेचा रस भेटेल. ते ऐकून सातशेतील सातच शिष्य शिल्लक राहीले. बाकी पळाले.शंकराचार्यांनी काचेचा रस पिला. वीष पिणारा असल्याने त्याला काहीही झाले नाही. तो मंडनमिश्राला म्हणाला वादाला उभा रहा. मंडनमिश्र त्याला म्हणाला आजपर्यंत अनेक जण येवून गंले आता तू आला आहेस. मंडनमिश्र सरस्वतीला म्हणाला,'सरस्वती माते आता तू बोल.' सरस्वती म्हटली,'येऊ द्या सन्याशाला' शंकराचार्य चारी वेदावर प्रश्न विचारत होता. सरस्वती न चुकता उत्तरे देत होती. तिला चारी वेद बोलता येत होते पण मधेच प्रश्न विचारल्यावर उत्तर देता येत नव्हते. शंकराचार्यांने तिला मधेच प्रश्न विचारला. तिला उत्तर देता येईना. शंकराचार्याने तीन वेळा तोच प्रश्न विचारला. तरीही प्रश्नाचे उत्तर न आल्याने त्याने पडदा उघडून बघीतले तर खापरामधे मधाचा घट देऊन त्यावर सरस्वतीची मुर्ती ठेवली होती. शंकराचार्याने दंडाने तो घट फोडला. म्हटला,' जारीणी ज्यच्या पोटी जन्म घेतलास त्यालाच वश झालीस. आता मी तुला सोडणार नाही'. शंकराचार्याने सरस्वतीला शाप दिला. 'आज पासून तू नीच लोकांच्या थार्याला जाशील'. त्यामुळेच आपल्याला महारामांगाच्या घरात कला दिसते. सरस्वती म्हणाली, 'तू शंकराचार्य असून मला शाप देतोस तर मी पण तुला शाप देते. जे भी तुझे भक्त असतील ते किटकाच्या भक्षस्थानी पडतील'. लिंगायत वाणी, लिंगायत तेली, जंगम, लिंगायत ढोर यांच्या मधे मृतास जमिनीत पुरतात व त्यांचे शरीर कीटकाच्या भक्षस्थानी जाते. यांची मुलाखत व गाणी २२ व २३ नोव्हेंबर २००० ला आळंदी येथे घेतली. कार्तीकी एकादशी निमित्त त्या यात्रेच्या वेळी आल्या होत्या. यांचा नवरा पण बरोबर यात्रेला आला होता. | ||