Cast: ढोर कंकय्या / Dhor Kankayya Village: पाथरी / Pathri Taluka: पाथरी / Pathri District: परभणी / Parbhani Gender: F | वयः६० मुलगेः २ मुली २ व्यवसाय ः केळी विकण्याचा धंदा करतात. विधवा, आता बराच वर्षे मुंबईत रहातात. या केळी विकून पोट भरतात.साळुबाई नांदुरे यांची भाची. त्या दोघी एकत्रच या सांगत होत्या की त्यांची कहाणी फार दुःखाची आहे. नवरा मरून पुष्कळ वर्षे झाली. त्याला दमा होता. घरची परिस्थितीः एक मुलगा लहान असताना वारला. एक मुलगी पण वरली. दुसर्या मुलाला विरोधकांची मारला. त्याची मुले आता मोठी आहेत, एत अकरावीत आहे तर दुसरा नववीत आह. ती दोघे त्यांच्या आई जवळ रहातात. या आपल्या मुलीकडे रहातात. मुलीकडे रहावे लागते याची फार खंत वाटते. सुनेशी जमत नाही. आता एक पण मुलग जिवंत नाही. गावी असताना खूप कष्ट करावे लागत. सासुरवास असे. पुष्कळ दळायला लागायचे. म्हणून आज सुध्दा ओव्या पाठ आहेत. सगळी दुःख विसरण्यासाठी हा वारीचा मार्ग धरला.त्या म्हणाल्या की त्या कंकय्या ढोर आहेत. गळ्यात लिंग आहे. तसे हे लोक शिव भक्त असतात. यांची मुलाखत व गाणी २२.११.२००० आळंदी येथे घेतली. कार्तीकी एकादशी निमित्त त्या यात्रेच्या वेळी आल्या होत्या. | ||