Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: कळम / Kalam District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वय: ६० शिक्षण ः नाही मुलगेः २ मुलगीः १ सासर ः कडकनाथवाडी माहेर ः येडशी व्यवसाय शेती. पाच एकर कोरडवाहू, नवरा दारूड्या, शेती करत नाही घरची परिस्थितीः आता पुण्याशेजारी पिंपरी येथे रहातात. एक मुलगा पिंपरीत कारखान्यात नोकरीला, दुसरा जीप चालवतो.मुलगी शेजारी भोसरीत दिली आहे. मुलगे विचारीत नाहीत. मुलांच्या शेजारी एकट्या रहातात. कधी शेत मजुरी करतात , कधी भंगार वेचायला जातात आता दोन महिन्या पूर्वी त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली. अजून चांगले दिसत नाही. तरी आळंदी पासून माऊलींच्या पालखी मागे चालत आल्या. त्या म्हणाल्या की माऊलींच्या कृपेने त्रास झाला नाही. मुलीची माया आहे. ती म्हणत होती जाऊ नको म्हणून. या वर्षी पंढरपूर पर्यंत चालत जाणार नाहीत.' वारी निघाली तेंव्हा वाटल माझ समद गणगोत चाललय. मग मला राव्हेना. माऊलीनी मला कस आणल ते माऊलीलाच ठाऊक त्या पंढरपूरला पायी वारी करत पालखी बरोबर पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या मुलाखत व ओव्या २६.६.२०००ला पुण्यामधे घेतल्या. | ||