Cast: देशमुख / Deshmukh Village: घरणी / Gharani Taluka: चाकुर / Chakur District: लातुर / Latur Gender: F | वयः ६५ वाचता लिहिता येते. मुलगाः १ व्यवसायः शेती ८० एकर, ज्वारी, भुईमुग, कापुस,उडीद, तूर. शेती कोरडवाहू आहे. घरची परिस्थितीः चांगली आहे. यांचा मुलगा पोलीस पाटील आहे. पोलीस पाटील हे पद गेल्या वीस वर्ष त्याच्या कडे आहे. पूर्वी तो सरपंच होता. याला तीन मुली व एक मुलगा आहे. भाऊबंदांशी कोर्टकचेर्या चालू आहेत त्यामुळे घराची सुधारणा करु शकत नाहीत. यांना सर्व प्रकारची गाणी येतात. भजन, जात्यावरील ओव्या इ. धार्मिक ग्रंथ वाचतात. यावेळी गावातील स्त्री पुरुष जमतात. या पारंपारिक औषधे देतात. यांच्या घरात जातपात पाळली जाते. मांग बाई अंगण सारवायला येते पण घरात प्रवेश नाही. पूर्वास्पृश्यांना औषधे देतात पण लांबून देतात. घरातील धुणीभांडी करण्यासाठी कोळ्याची बाई येते. यांचा घरात दरारा आहे. कारभार स्वताः व त्यांची सुन त्यांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. त्यांची सुन त्यांच्या सख्या भावाची मुलगी आहे. यांचे कुटुंब गावात वतनदार आहे. आता यांच्या नातीचे लग्न १९९९ मधे झाले आहे. नातीच्या लग्नात एकलाख अकरा हजार रुपये हुंडा दिला. लग्नाला एकूण चार लाख रुपये खर्च झाला. हिच्या लग्नात दोन एकर शेती विकली. नातीचा नवरा एका शाळेचा मुख्याधापक आहे. सरुबाईंचा भाऊ गोपाळराव पाटील हे भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभेवर खासदार म्हणून गेले आहेत. १९९९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते भा. ज. प. तर्फे लातुरहून उमेदवार आहेत. यांना प्रथम भेटलो १९९४ साली व परत भेट दिली ती १६.८.१९९९ या दिवशी | ||