Cast: सोनार / Sonar Village: / Taluka: शिरुर / Shirur District: पुणे / Pune Gender: F | वय ः ६३ शिक्षण ः सातवी मुलगे ः ६ मुलगीः १ आईकडुन व चुलतीकडुन ओव्या शिकली. घरची परिस्थितीः शिरुर मध्ये स्वःताचे घर आहे. सगळी मुले नोकरी धंदयाला अाहेत माहेर पळसदेव ता इंदापुर जि पुणे आईला सात बहिणी तीन भाऊ आहेत. आई सर्वात मोठी आहे. अतिशय कष्टातून संसार उभा केला. शिरुरला माणिकचंद जर्दाचा तंबाखूचा कारखाना होता. या कारखान्यातून तंबाखू आणून त्याच्या पुड्या बनवायचे काम करायच्या. त्यातून जो पगार येईल त्यावर संसार चालायचा. पती शिरुरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मापाडी (तोलाई कामगार म्हणून कामाला होते. त्यांना दारुचे व्यसन होते. बरीचशी मिळकत दारुवर खर्च व्हायची. त्यांच्या एकट्याच्या कमाईमध्ये संसार चालवणे अवघड होते. सासू व मुलांना सोबत घेवून यांनी संसार चालवला. मुलांचे शिक्षण केले. | ||