Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: इंदापूर / Indapur District: पुणे / Pune Gender: F | वय: ६० मुलगेः ३ मुलगी ः नाही व्यवसाय ः शेती आहे. पूर्वी कोरडवाहू होती. आता शेतीला उजनी धरणाचे पाणी उपलब्ध झाले आणखी जमीन घेऊन चांगला मळा फुलवला आहे. घरची परिस्थितीः त्यावेळी पुष्कळ त्रास काढला. प्रसंगी भाजीचे पिळे करून खाल्ले. त्यामुळे परिस्थिती चांगली झाली आहे. यांचे यजमान शिक्षक होते. पण पूर्वीच्या काळी शिक्षकांना पगार कमी मिळत व दुष्काळामुळे कोरडवाहू जमिनीत पिकत नसे. मोठा मुलगा लष्करात आहे. त्याची मदत होते. दुसरा मुलगा शिकून शिक्षक झाला. तो गावातल्या शाळेत नोकरीला आहे. त्यामुळे शेतीकडेपण बघतो. त्याने या दिंडीत पुढाकार घेतला आहे. घरी अॉइल इंजीनच्या दुरुस्तीचे काम पण करतात. त्याची एजन्सी मिळाली आहे. धाकटा मुलगा भावाच्या मुलांना शाळेत पोचवणे आणणे असे काम करतो. इंजीनचे पार्ट खरेदी करण्याचे काम करतो. यांना पुष्कळ ओव्या येतात. पूर्वी दुष्काळ पडायचे त्यावरच्या सुध्दा पुष्कळ ओव्या येतात. यांना आम्ही २४.७.१९९९ला पंढरपुर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी भेटलो व ओव्या घेतल्या. | ||