Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: करमाळा / Karmala District: सोलापूर / Solapur Gender: F Songs by Jadhav Saru (48) | वय: ४५ शिक्षण नाही व्यवसाय ः शेती यांनी पुष्कळ ओव्या सांगितल्या. त्यांना गणगोत, शेत, बैल या विषयांवरची गाणी येतात ती त्यांनी सांगीतली. पण अशा विषयांवरची गाणी आम्हाला आवडतात हेच मुळी या बाईंना पसंत नव्हते. अस्तुरी जलम कुणी घातला येड्यानी/ पराया घरी बैल राबतो भाड्यानी ही ओवी येते का असे विचारल्या वर त्यांना रागच आला. त्यांच्या मतानी फक्त देवाच्या ओव्या म्हणायला हव्यात. यांना आम्ही २४.७.१९९९ला पंढरपुर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी भेटलो व ओव्या घेतल्या. | ||