Cast: वंजारी / Vanjari Village: / Taluka: गंगखेड / Gangakhed District: परभणी / Parbhani Gender: F | वयः३५ मुलगाः १ मुलगीः नाही व्यवसायः शेती वडिलांच्या गावी नवर्याने शेती धेतली आहे. पहीली सहा एकर होती. आता नवीन जी शेती घेतली आहे त्यात विहीर पाडली आहे. त्या शेतीत ऊस, बाजरी, तूर, मूग, तांदूळ अशी पिके घेतात. घरची परिस्थितीः नवरा एस्. टी मधे डृायव्हर आहे. माहेरी तीन भाऊ. या एकच बहीण आहेत. त्यामुळेच वडिलांच्या गावी रहातात. यांचे बरेच सोवळे आहे. आषाढ महीन्यात देवीचे उपास धरतात. दिवसातून एकदाच जेवतात. दिंडीत जो सर्वांसाठी स्वैपाक होतो त्यात या जेवत नाहीत. दोन कीर्तनकार, वडील व स्वतःचा वेगळा स्वैपाक करतात. त्याचे कारण इतर बायका सोवळे पाळत नाहीत. दररोज अंघोळ करत नाहीत व संडासला जाऊन आल्यावर हातपाय धूत नाहीत मग त्यांनी केलेला स्वैपाक चालत नाही.. यांना जात्यावरली पुष्कळ गाणी येतात. नुसती जात्यावरलीच नाही तर देवीची गाणी, भजने हे पण पाठ आहे. यांची मुलाखत व ओव्या पंढरपूर येथे २७.७.१९९९ ला घेतल्या | ||