Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: करमाळा / Karmala District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ३५ मुलगेः ३ मुलगी ः नाही या आराधी आहेत म्हणजे देवीची भक्ती करणार्या आहेत. यांना सर्वप्रकारची गाणी येतात त्यात देवीची गाणी, भजने, जात्यावरील ओव्या यांचा समावेश आहे. या देवीच्या भक्त असल्याने त्यांना परडी आहे. पांडुरंगाच्या वारीत देवीची म्हणजे आराधीची गाणी म्हणण्यास बंदी आहे. आराधीची गाणी म्हटली तर वारीतील महाराज रागावतात. त्या म्हणाल्या की देवी व पांडुरंग यांचे भांडण आहे. हे दोघे एकमेकाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. या बाई ओव्या देत होत्या त्यावेळी दिंडीत कीर्तनाची वेळ झाली. दिंडीतील चोपदार सर्वांना कीर्तनाला चलण्याची जबरदस्ती करत होते. यांनी ट्रकच्या पाठीमागे जागा निवडली की जेथून त्या व आम्ही चोपदाराला दिसणार नाही. तिथे ओव्या सांगीतल्या त्यांनी सांगितले की माझी परडी एका मुलाकडे जाणार. पण देवी आणखी परत येणार व माझ्या दुसर्या मुलाकडे नवीन परडी येणार. यांना आम्ही २४.७.१९९९ ला पंढरपुर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी भेटलो. | ||