Cast: नवबौध्द / Navbaudha Village: कुंभवे / Kumbhave Taluka: दापोली / Dapoli District: रत्नागीरी रत्नागीरी / Ratnagiri Gender: F | वयः ७० मुलगेः २ मुलगीः १ यांचे माहेर सानेगुरूजींच्या गावचे. शेतीः थोडी आहे. मुख्यतः भाताचे पीक घरची परिस्थितीः यांचे दोन्ही मुलगे मुंबईस नोकरी करतात. मुलगी ललीता भिकुराम जाधव यांचे सासर विण्हे ता. मंडणगड, रत्नागिरी. यांना गाणे म्हणण्याची आवड आहे. पुष्कळ गाणी येतात. ओव्यांबरोबर पाळणे, भात लावणीची गाणी, उखाणे, फेराची गाणी हे सर्व येते. ते सर्व त्यांनी म्हणून दाखवले व लिहून घेण्याचा आग्रह केला. मुलगी माहेरी आली होती तिला पण त्या गाणे म्हणण्याचा आग्रह करत होत्या. त्यांच्या मते गावात पाहुणे आले तर गावाच्या नावासाठी गाणा सांगावीत. यांच्या इतकी गाणी येणारी गावात दुसरी बाई आता नाही. यांची मुलाखत व गाणी ४.२.२००४ या दिवशी घेतली | ||