Cast: मराठा / Maratha Village: रुई / Rui Taluka: रेणापूर / Renapur District: लातूर / Latur Gender: F | वय ः ५० मुलगाः १ व्यवसाय ः शेती १५ एकर. स्वःताला कामधंदा करावा लागतो. ओव्या पेक्षा त्यांनी दुःखच खुप सांगितले.आणि सांगितलेल्या ओव्यामध्ये भावावरच्या ओव्या खुप सागिंतल्या .एक मुलगा आहे त्या शिकवण्याचा त्या आटोकाट प्रयत्न करतात.भ्रतारावर ओव्या येतात पण मी कधी गायले नाही. भावाविषयी ओव्या गाण्यात फारसा आनंद वाटत नाही. घरची परिस्थितीः घर माळवदाचे आहे. शेती आईकडुन मिळालेली आहे. त्यांना वडील नाहीत ,भाऊही नाही. फक्त मलगा आहे. शेजारी पाजारी म्हणू लागले, कसली सुन करुन आणली. ना भाऊ, नाही तुझ्या लेकाला सासुरवाडीत जोडा सोडायला जागा नाही.आणि त्यांनी त्रास द्यायला सुरवात केली आणि एक वर्षात मुलाचे दुसरे लग्न केले. सासूच्या आणि सवतीच्या जाचामुळे माहेरी येऊन राहिले.नवर्यानी काही गुन्हा नसतानी टाकले. | ||