=> Display all villages (1120 records)
Taluka: मुळशी - Mulshi District: पुणे - Pune Valley: मुळशी - Mulshi State: Maharashtra Corpus: Western Maharastra Performers: खराडे लक्ष्मी - Kharade Lakshmi मेंगडे अनुसया - Mengde Anusya मेंगडे लक्ष्मी - Mengde Lakshmi मेंगडे शाहू - Mengde Shahu मेंगडे शाहू - Mengde Shahu मेंगडे शांता - Mengde Shanta नरे शांता - Nare Shanta |
आम्ही (हेमा राईरकर,बर्नार बेल, शेजवळ, उषा खळदकर) हिरडी गावाला १७ मे १९९८ ला गेलो होतो. या गावाला जायला रस्ता नाही. पाऊलवाटेने चालत जावे लागते. पिप्री पासून एक वाट आहे. दुसरी वाट घुटक्यापासून आहे. गावात बैलगाडी सुध्दा येवू शकत नाही.गावात कोणताही माल आणायचा असेल तरी तो डोक्यावरुन वाहून आणावा लागतो. रस्ता जंगलातून जातो. पक्का रस्ता करण्यास जंगल खाते परवानगी देत नाही.या गावाला ग्रुप ग्रामपंचायत आहे. गावात ४० उंबरठा आहे. लोकसंख्या साधारणपणे २०० /२२५ च्या घरात आहे. शेतीत भात पिकते. वरी नाचणीचे पीक येते. अून्हाळ्यात पाण्याची प्रचंड पाणी टंचाई येते. देवळापाशी एक टाके आहे. एक विहीर आहे. उन्हाळ्यात घरटी फक्त पाच हंडे पाणी मिळते. कोणत्याही प्रकारची मजूरी गावात उपलब्ध नाही. टाटा कायम काम देत नाही. लोक कंत्राटदाराकडे मजूरीनी जातात. गावाच्या पश्चिमेला घाटा खाली टाटाचे बिरा येथील पॉवर हाऊस आहे. तिथे जाण्यास मोठा डोंगर उतरुन जावे लागते. या गावाला अर्थातच वीज नाही. काही तरुण रोज बिर्याला जावून येवून काम करतात. | ||