Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: दापोली / Dapoli District: रत्नागीरी / Ratnagiri Gender: F | वय ः३५ सासरः गव्हे माहेरः दापोली सवाष्ण या माहेरात रहातात. बहुजन हिताय वस्तीगृह दापोली याच्या समोर त्या रहातात व त्याच वसतीगृहात स्वैपाक बनवण्याचे काम करतात. रमाबाईंच्या आईची आई व वत्सलाबाईंची सासू या सख्या मावस बहीणी. रमाबाईंच्या आईचे माहेर गव्हे. वत्सलाबाई काही दिवस सासरी राहील्या व पुढे त्यांचे बिर्हाड नवर्यासह दापोलीत हालले. त्या सांगत होत्या की लहानपणापासूनच आता जिथे बहुजनहिताय वस्तीगृह आहे तिथे त्या खेळल्या आहेत. बहुजनहिताय वसतीगृह बांधले ती जागा बाबासाहेवांच्या वडलांची होती. बाबासाहेबांचे वडील रामजी हे मूळचे आंबवडे गावचे. पूर्वी हे गाव दापोली तालुक्यात येत असे आता ते गाव मंडणगड तालुका जि. रत्नागीरीत येते. रामजी सैन्यातून निवृत्त झाल्यावर आपल्या गावी येऊन राहीले. त्यांना औषधपाण्याला दापोलीस यावे लागे ते अंतर ६५ कि.मि आहे. त्या काळी वहानांची सोय नसल्याने रामजींनी दापोलीतील ब्रिटिशांचा जो लष्करी कँप होता तेथील अधिकार्यांना दापोली कँप मधे जागा देण्याची विनंती केली. तेथे त्यांना जागा मिळाली. काही दिवस बाबासाहेब दापोलीच्या शाळेत होते असे म्हणतात. आजही रामजींनी बांधलेले छोटे घर तिथे आहे. पुढे बाबासाहेबांनी ती जागा वसतीगृह करण्यास दिली.थोड्या जागेत आज बाबासाहेबांच्या वडलांचे घर व छोटे बुध्द मंदीर आहे. उरलेल्या जागेत वसतीगृह आहे. आज वसतीगृहात ७२ मुले आहेत. तिथेच आणखी इमारत बांधण्याचे काम चालू आहे. त्यात वसतीगृहच होणार आहे. आणखी काही मुलांची सोय होईल. बाबासाहेबांना दापोलीबद्दल विशेष आत्मियता वाटत होती कारण त्यांचे बालपणाचे काही दिवस तिथे गेले व रमाबाईचे माहेरपण त्याच तालुक्यातील म्हणून रमाबाईंच्या नावाने सुध्दा तेथे एक वसतीगृह बाबासाहेबांनी चालू केले. आजे ते चालू नाही. तिथे शाळा व्हावी असे प्रयत्न चालू आहेत. वत्सलाबाई सांगत होत्या की आताच्या बहुजनहिताय वसतीगृहाच्या जागी एक फणसाचे झाड होते. आम्ही त्याचे गरे खायचो. पुढे त्या मोकळ्या जागेत १४ एप्रिल व ६ डिसेंबर साजरे करू लागलो. दिवसभर कार्यक्रम घ्यायचो व रात्री सुध्दा लाईटिंग करायचो. आजे तिथे बुध्दमंदीर आहे व त्यात हे कार्यक्रम होतात. यांची मुलाखत व गाणी ५.२.२००४ ला घेतली | ||