Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: दापोली / Dapoli District: रत्नागीरी / Ratnagiri Gender: F | वयः २५ यांचे यजमान राज्य परीवाहन मंडळात कंडक्टर आहेत. यांचे यजमान सांगत होते की पूर्वी यांचे आई वडील केशवसुतांची शेती अर्धेलीने करत असत. शांताबाईंनी बाबासाहेबांना वीष घातले हे गाणे या बाईंना येते पण त्या म्हणाल्या की आता त्यावर बंदी घातली आहे. शांताबाई कोर्टात गेल्या होत्या. ते गाणे आम्ही म्हटले तर या गावच्या बायांनी गाणे दिले असे सिध्द होते म्हणून आम्ही म्हणत नाही. त्यांना सांगितले की हा इतिहास आहे का नाही हा प्रश्न नसून ती तुमची अभिव्यक्ती आहे तेंव्हा त्यावर का बंदी असावी ते कळत नाही. त्यावेळी त्यांनी ते गाणे म्हणून दाखवले. यांची मुलाखत व गाणी ५.२.२००४ ला घेतली. | ||