Cast: मराठा / Maratha Village: ब्रह्मगाव / Brahmagaon Taluka: परांडा / Paranda District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ४५ शिक्षण ःनाही दोन मुलगेः २ मुलगी ः नाही सवाष्ण यांचे यजमान किर्लोस्करमधे ठेकेदार आहेत. तीस वर्ष झाली तरी कायम नाही. त्यामुळे नोकरीचे कोणतेच फायदे नाहीत. आम्ही दोघे अंगठे बहाद्दर म्हणून मुलांना शिकवण्याची जिद्द धरली. थोरला एम्. ए. झाला पण नोकरी नाही. धाकटा दहावी झाला त्याने शिक्षण सोडले. तो म्हणतो की मोठ्या भावाला इतक शिकून नोकरी नाही तर मी कशाला शिकू? आम्ही आईबाप पहिल्या पासून कष्ट करतो. मग शरीर धडधाकट आहेत. पण पोर नाजूक त्यांना कष्टाच काम होणार नाही. त्यांना हलक काम करू वाटत नाही. आम्ही जोधपूरकरांकडे वॉचमन म्हणून गेली तीस वर्ष रहातो आहोत. ते त्या वेळी पिंप्रीत रहात होते. आता तीन वर्ष झाली इथे रहायला आले. ही त्यांची १६ गुंठे जमीन आहे ती त्यांनी बिल्डरला विकली. आता आम्हाला जागा सोडायला सांगतात. आम्ही कुठ जाणार. माझा भाऊ बार्शीत असतो. त्याची परिस्थिती चांगली आहे. तो गेली सात वर्ष झाली भेटला नाही. माझी परिस्थिती दुबळी आहे. कोण विचारणा? माझा देवावर भरवसा आहे. ही जोधपूरकरमंडळी ख्रिश्चन आहेत. या बाई सांगतात की तू मंगळसूत्र घालू नको. कुंकु लावू नको. देवाची पूजा करू नको. मी पोलीसात गेले. पोलीस म्हणाले की तू तुझी पूजा कर. मी तुळजापूरला जाते. सतत जाण होत नाही. आता माझी तब्येत बरी नसते. देवानी प्रचीती दिली व दारात औदुंबराचे झाड आले. मी त्याला प्रदक्षिणा घालायची. यांनी ते तोडून टाकले. ते झाड परत उगवले तर आता तिथे कट्टाच बांधला. पूर्वी गावाला आम्ही चार जावा होतो. पुष्कळ दळायचो. घरची गरीबी. घरी जात नव्हत तर याच्या त्याच्या दारात जाऊन दळायचो. पुष्कळ गाणी म्हणायचो. आता तीस वर्ष झाली इथे हडपसरला रहाते. गाणी पटकन आठवत नाहीत घरची परिस्थितीःपरिस्थितीचा या बाईंच्या डोक्यावर फार ताण आहे असे जाणवले. परफॉरमर नं २८१४ सरोदेबाईंच्या आवारातच या बाई रहातात यांची मुलाखत व गाणी हडपसर येथे १३.१२.२००१ ला घेतली | ||