Warning: Undefined variable $performer_picture_url in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 318
Cast: ख्रिश्चन / Christian Warning: Undefined variable $village_devanagari in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Warning: Undefined variable $village in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Village: / Taluka: अहमदनगर / Ahmednagar District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वयः ७० अविवाहीत शेती नाही या लहानपणापासून अनाथ. यांना नगरच्या सेंट मोनीका बोर्डींगमधे ठेवले होते. यांना एक भाऊ व एक बहीण. बहीण व या एकाच बोर्डींगमधे होत्या. भाऊ मुलांच्या बोर्डींगमधे होता. या धाकट्या. भाऊ सर्वात थोरला. बहीण आता वारली. तिला पुष्कळ ओव्या यायच्या. तिचे भावावर अतिशय प्रेम, ती भावावरून पुष्कळ ओव्या म्हणायची. बोर्डींगमधे मोठा हॉल असायचा. तिथे जाती ठेवलेली असायची. दोघी दोघींना एक शेर दळण दळावे लागायचे. त्यावेळी सर्वजणी जात्यावर दळताना ओव्या म्हणायच्या. या शिक्षिका होत्या. बरीच वर्षे मनमाडला होत्या. त्या नंतर नाशिकला सात वर्षे होत्या. यांच्या नाशिकच्या सुपरीटेंडट जोशी या अजून नाशिकलाच रहातात चर्चच्या आवारात यांचे त्यांच्याकडे जाणे येणे आहे. या प्रथम नाशीकमधेच भेटल्या. या आता आपली भावाची मुलगी सुंदर जोधपूरकर हिच्या जवळ हडपसरला रहातात. जोधपूरकर पूर्वी पिंप्रीत रहायचे. जोधपूरकर कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी ही हडपसरची १६ गुंठे जागा धेऊन ठेवली आहे. जोधपुरकरबाई चर्चचे काम करतात. ही सर्व मंडळी आता पूलगेटपाशी प्रोटेस्टंट चर्च मधे जातात. यांची मुलाखत व गाणी हडपसर येथे १३.१२.२००१ ला धेतली. | ||