Cast: नवबौध्द / Navbaudha Village: तुरूरी / Tururi Taluka: उमरगा / Umarga District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ५५ शिक्षण नाही मुलगेः ३ मुलगी ः १सवाष्ण या मुळच्या तुतरीच्या असल्या तरी बर्याच वर्षापासून पुणे बोपोडी येथे स्थलांतरीत झाल्या आहेत. त्याचे कारण मुळच्या गावी जगायचे साधन नाही. इथे आल्या वर मिळतील ती कामे केली. इथेच आता पक्क्या बांधणीचे घर केले आहे. एक मुलगा १२ वी नापास तो नोकरी करतो. दुसरा मुलगा १० पास त्याला नोकरी नाही. तिसरा मुलगा १० नापास बेकार भटकत असतो. नवरा नोकरी करायचा. मुलगी १२ वी झाली तिच लग्न केल. यांच्या वस्तीत बरेच विहार आहेत. यांच्या शेजारी जो विहार आहे तिथे या काही बाया जमतात. यांचे ४० जणींचे महिलामंडळ आहे. तिथे भीम गीते, पाळणे वगैरे म्हणतात. गुरवारी दुपारी १ पासून ४ पर्यंत जमतात. भीमगीते गाण्याच्या स्पर्धा आयोजित करतात. भीमगीतातील कडवी या ओव्या म्हणून सुध्दा म्हणतात. आता दळण संपले म्हणून ओव्या पटपट आठवत नाहीत यांना २५.१०.२००१ ला प्रथम नागपूरला भेटलो व मग बोपोडी येथे १३.११.२००१ ला भेटलो व त्यांच्या ओव्या आणि मुलाखत घेतली. | ||