Warning: Undefined variable $performer_picture_url in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 318
Cast: ब्राम्हण / Brahman Warning: Undefined variable $village_devanagari in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Warning: Undefined variable $village in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Village: / Taluka: निलंगा / Nilanga District: लातुर / Latur Gender: F Songs by Auradkar Latika (196) | वयः ७२ मुलगे ः २ मुली ः ३ विधवा यांचे वडील रामराव सबनीस शेंदरकर ते निलंगेकरांना दत्तक गेले. यांचे लग्न किसनराव औरादकरांशी झाले. ते निलंग्यात रहात. या बाईंना दोन मुले झाल्यावर रझाकार चळवळीच्या वेळी यांचे यजमान तुरूंगात गेले. त्यावेळी त्या दोन महिन्याच्या गरोदर होत्या. पण ते कस कोणाच्या लक्षात येणार. मग त्यांना वाटले की नवरा तुरूंगात व आपण फक्त दोन महिन्याच्या गरोदर. लोक विश्वास ठेवणार नाहीत. त्यांनी विहीरीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. पण वेळेवर लोकांनी वाचवले. त्यांना निलंग्यातून पळून जावे लागले. त्या वाटेत बाळंत झाल्या. तसेच पंढरपूरला जाऊन त्या व त्यांच्या सासुबाई राहिल्या. पुढे नवरा सुटुन आला. तो पर्यंत निलंग्याची शेती, घरदार नातेवाईकांनी हडप केले होते. मग त्यांनी नांदेडला मुक्काम हलवला. त्यांचे यजमान वकीली करीत. ते १९९५ साली वारले.या बाईंच्या आई व सासुबाई चांगल्या ओव्या म्हणत त्यामळे यांना पण अनेक ओव्या येतात. यांचा मोठा मुलगा बँकेत नोकरीला होता. दुसरा प्राध्यापक आहे. एक मुलगी प्राध्यापक आहे. यांची मुलाखत व गाणी नांदेड येथे १८.१० २००१ ला घेतली. | ||