Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: नांदेड / Nanded District: नांदेड / Nanded Gender: F | वयः५७ मुल नाही. सवाष्ण घरची परिस्थितीः हेड मास्तर. शिक्षण बी.ए. ज्युनीयर पी.टी.सी. या नांदेड मधे शिकल्या. ताराबाई परांजपे यांना शिक्षिका होत्या. त्यांनी या १२ मुलींना देगलुगरला नेले होते. तेथील लोकांच्या रहाणीच्या पध्दती, परंपरा, गाणी गोळा करण्यास ताराबाईंना मदत केली. ताराबाईंच्या प्रबंधाचा विषय होता.विहारात ग्रंथांचे वाचन असते त्यात त्या सहभागी असतात. नवरा कुष्टरोग निरिक्षक होता. निवृत्त त्रिरत्न विहाराच्या बांधकामाची जबाबदारी आहे. या आता नांदेड येथे रहातात. विहारात रायबोलेंनी यांना बोलावले. तिथे ओव्या सांगितल्या. भीमाची इतर गाणी म्हणण्याचा परीपाठ आहे. या बाईंची आई याच झोपडपट्टीत रहाते. यांना चार भाऊ त्यापैकी एक वारला. एका भावाचा मुलगा जवळ ठेवला आहे. यांचे सुजाता महीला मंडळ आहे. त्यांची आई म्हणाली की आम्ही इथे रहायला आलो तेंव्हा खूप मोकळी जागा होती. इथे एक मरीआईचे देवूळ होते. प्रयागबाई म्हणाल्या की त्या मरीआईच्या देवळाच्या भींतीच्या त्रिरत्न विहाराला पायर्या केल्या. या बाईंनी घरात मात्र नवरात्राचा घट बसवला होता. तो कोणी पाहू नये म्हणून खोलीचे दार लावून घेत होत्या. आम्ही निघताना त्या रायबोलेंना म्हणाल्या की या बाईंचा म्हणजे हेमा राईरकर यांचा चेहरा सविता आंबेडकरांसारखा दिसतो. राईरकर या ब्राहृण असे वाटल्याने कदाचित अशी प्रतिक्रिया झाली असेल. यांची मुलाखत व ओव्या २०.१०.२००१ला घेतल्या. | ||