Cast: नवबौध्द / Navbaudha Village: गंगापूर / Gangapur Taluka: गंगापूर / Gangapur District: औरंगाबाद / Aurangabad Gender: F | वयः७५ विधवा आता मुलीकडे सातपुर नाशिक येथे रहातात. गंगापूरचा कालवा बांधण्याचे काम चालले होते तेंव्हा वरून सात विमाने गेली. मधल्या विमानाला फुले होती. त्यात बाबांचे प्रेत दिल्लीहून आणत होते. आम्हाला सांगितले की बाबा गेले. आम्ही लगीचच काम बंद केले.त्या पुढे नवर्याबरोबर कामाला मुंगी पैठणला होत्या १० वर्ष. तिथे खूप गाणी म्हणायच्या. सातपुर हा नाशिकचा भाग. पूर्वी नाशिकच्या शेजारी खेडे होते. आता नाशिक महानगरपालीकेत आले आहे. यांच्याकडे ११.९.२००१ ला जाउन ओव्या गोळा केल्या. (सात विमानांची गोष्ट म्हणजे मिथ कशी जन्माला येते त्याचा नमुना आहे.) | ||