Cast: मराठा / Maratha Village: वंजरवाडी / Vanjarvadi Taluka: इगतपुरी / Igatpuri District: नाशिक / Nashik Gender: F | वयः ७० मुलगा ः नाही मुलगी ः १ माहेरः गायधनी घरची परिस्थितीः परिस्थिती चांगली आहे. आंधळ्या बाई आहेत. वयाच्या तीन वर्षानंतर दिसेनासे झाले. यांचे लग्न झाले त्या माणसाला मूल नव्हते. मुलासाठी लग्न केले. एक मुलगी झाली व नवरा वारला. यांनी आपल्या मुलीचे लग्न आपल्या माहेरात केले. या बाईंचे . त्यांनी मुलीला गायख्यांना दिली आहे. मुलीची त्या आता मुलीजवळ रहातात. आवाज अतिशय चांगला अाहे. पुष्कळ गाणी येत होती. यांची मुलगी म्हणाली की अशा आंधळ्या पांगळ्या माणसांना देवाचा, गाण्याचा छंद असतो. यांना पुष्कळ भजने, गवळणीपण येतात. २३.७.२००१ ला नाशिक येथे कार्यक्रम होता त्या साठी जाताना वाटेत पळसे गावी २२तारखेस थांबून ओव्या गोळा केल्या. परत पळशे गावाला १०.९.२००१ ला भेट दिली त्यावेळीपण यांनी ओव्या सांगितल्या. | ||