Cast: कलार / Kahar Village: / Taluka: पांडुरणा / Pandurna District: छिंदवाडा / Chindvada Gender: F | वयः ७५ मुलगे ः १ मुलगी ः नाही व्यवसाय ःशेती. एक एकर होती ती गेली सतत मजुरी करावी लागते. घरची परिस्थितीः परिस्थिति अत्यंत हालाखीची आहे. या व यांचे यजमान दोघेच पंढरपुरला आले होते. याचा मुलगा आता मास्तर आहे. त्याला चार मुले आहेत. त्यांचा दीर, जाऊ, पुतण्या ही मंडळी निराळ्या रेलवेनी आली. चुकामुक झाली. यांनी पंढरपुरला यायचे ठरवले कारण यांच्या बहीणीचा मुलगा ईश्वरनाथजी उमाठे हा वारकरी आहे. तो अमृतबाबाजींच्या दिंडीत वारीला येत असतो. त्याची व यांची पण चुकामुक झाली. यांच्या जवळ काही नव्हते. दुसर्याकडून छोटे पातेले उसने घेऊन चहा केला. त्यावर दिवसभर बसून होत्या. या कबीरपंथी आहेत. कबीराची भजने येतात. पूर्वी पुष्कळ दळण दळले. त्यांच्या मते दळणावरची गाणी ही संसाराची गाणी. आता देवाची म्हणायची. पुष्कळ आग्रह केल्यावर थोडी दळणाची गाणी दिली.प्रथम त्या मराठीत बोलत होत्या. पण मग त्यांनी हिंदीतून बोलायला सुरवात केली. गाणीपण हिंदीतून दिली. शिवलिंग महाराज धर्मशाळेत या राहील्या होत्या. ही धर्मशाळा शिवलिंग नागनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे. ते संत गाडगे महाराजांचे शिष्य असून मातंग आहेत. कीर्तन करतात. या धर्मशाळेत अत्यंत गरीब परिस्थितील लोक उतरले होते. त्यातील बरेच मातंग होते. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||