Cast: मराठा / Maratha Village: जुनवडी / Junvadi Taluka: अहमदनगर / Ahmednagar District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वयः४५ मुलगेः २ मुलगी ः नाही व्यवसाय ः शेती. घरची परिस्थिती ः परिस्थिती चांगली होती. यांचे लग्न झाल्यावर चार वर्षात विधवा झाल्या. एक मुलगा ३ वर्षाचा होता व दुसरा सात महिन्याचा होता तेंव्हा नवरा वारला. दीर जमिनीतील काही देत नाहीत. भावाला नोकरी आहे. तो थोडाफार शिकला आहे. आता भावाने सासरची काही शेती नावावर करुन घेतली आहे. तरी अजून दीर त्यातले धान्य स्वतःच खातात.विधवा झाल्या पासून या सोनेगाव, ता. पाटोदा, जि. बीड येथे रहातात. माहेरची शेती आहे पण भाऊ घरी नसतो त्या मुळे शेती चांगल्या पध्दतीने होत नाही. शेत मजुरी करतात. आता आई म्हातारी आहे. ती मजुरीला जात नाही.आईला पुष्कळ जात्यावरल्या ओव्या येतात. लेकीनी रांडपण काढल, मुल मोठी होतील मग दुबळेपण सरेल अशा अर्थाच्या ओव्या आई म्हणते. या स्वतः जास्तीकरून देवाच्या ओव्या म्हणतात. माहेरची गरीबी पण सासरी मीरा असरूबा चवरे व मालन चवरे या यांच्या लांबच्या चुलत भावजया लागतात. या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती. विधवा | ||