Cast: ढोर कंकय्या / Dhor Kankayya Village: / Taluka: पाथरी / Pathri District: परभणी / Parbhani Gender: F | वयः ८० मुलगेः ३ मुलीः ४ व्यवसाय ः दोन मुले टेलर काम करतात. आता बराच वर्षे मुंबईत रहातात. लेकीची चुलत सासू तिच्या ओळखीने मुंबईस स्थलांतर केले. नवरा मरून २५ वर्षे झाली. या मच्छी कंपनीत कामाला होत्या. या म्हणाल्या की आम्ही येताना ५००ते ६०० रूपये बरोबर घेऊन येतो. आम्ही जरी मुंबईत रहातो आणि तिथे सर्व वस्तु मिळत असल्या तरी आळंदीत काही खरेदी करतोच. चोळीचा खण घेतो. मुला नातवंडाना काही घेतो. चुरमुरे, बत्तासे, पेढे हे तर घेतोच. या सर्वाला आम्ही प्रसाद समजतो. यांची मुलाखत व गाणी २२.११.२००० आळंदी येथे घेतली. कार्तीकी एकादशी निमित्त त्या यात्रेच्या वेळी आल्या होत्या. | ||