Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: पारनेर / Parner District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F Songs by Kotkar Paru (78) | वय ः६५ मुलगेः ३ मुलगीः २ घरची परिस्थितीः पारुबाई कोतकर नगरच्याबाजुच्या आहेत तीन मुलगे दोन मुली नवरा ४०/५० वर्षापुर्वी निघुन रुसुन आला घरी शेतीवाडी आहे. सुना नगर भागातल्या आहेत . एकतर भावाची मुलगी आहे, पुर्वी नव्यापेठेत राहात नवरापण हमालीच करत असे. या पण हारेवाल्या पुर आल्यावर गोखले नगरला गेल्या तीन खोल्या आहेत एक मुलगा रिक्षा चालवतो एकाला नोकरी आहे. पण सुना विचारत नाहीत. वाईट वागवतात. ज्यावेळी मंडईत जातात पुढे पत्रे घातले व मग मंडई बांधली मंडईच उदघाटन एका हमालाच्या हस्ते केल दरेकर च्याच नाव इतक जुन त्यांना आठवतय त्यांची आई पण मंडईत काम करायची वडील कोथरुडच्या बागेत काम करायचे तेथुन फाटी फुकट आणायाचे त्यावेळेस त्या जोरी नवी पेठ येथे राहात असत प्रथम तर मंडईत १ढब्बु पैसा मग एक भोकाचा पैसा अशी मजुरी घेतली आहे. ही मजुरी ४५ किलोच्या पोत्याला मिळायची पण त्यावेळेस त्यात भागायच नवर्याची हातगाडी होती. पोर झाली पहिली दोन मुल झाली तो पर्यंत मुल पाटीत टाकुन हात गाडीवरुन मंडईच न्यायची मुलगी झाल्यावर आपली मुलगी शेजारची मुलगी यांना घरी सांभाळायला ठेवल त्या शेजारच्या मुलीला ६ रु द्यायचे महिना. अाता परिस्थिती बिकट झालीय सुना विचारत नाहीत. एक सुन पळुन गेली नातंवड यांच्या गळ्यात पडली. १२-३ १९९१ला यांची मुलाखत घेतली. | ||