=> Display all villages (1120 records)
Taluka: मुळशी - Mulshi District: पुणे - Pune Valley: मुळशी - Mulshi State: Maharashtra Corpus: Mawal Performers: कोकरे भागू - Kokare Bhagu मराठे तान्हा - Marathe Tanha सकपाळ सीता - Sakpal Sita सकपाळ तारा - Sakpal Tara |
|||
Hamlet: अधरवाडी - Adharwadi Taluka: मुळशी - Mulshi District: पुणे - Pune Valley: मुळशी - Mulshi State: Maharashtra Corpus: Mawal |
अधरवाडी गावाला आम्ही (हेमा राईरकर, बर्नार बेल, शेजवळ,उषा खळदकर) सोळा मे १९९८ ला गेलो होतो. अधरवाडी हे पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. त्यानंतर रायगड जिल्हा सुरू होतो.अधरवाडी ही ताम्हीणीची वाडी. गाव व वाडी यात डोंगर आहे. गावात जाण्यास ३० ते ३५ मिनीटे चालत जाण्याचा रस्ता आहे. वाडीत ४०/४५ घरे आहेत. मुख्य पीक भाताचे. त्याच बरोबर वरी, नाचणीचे पीक होते. इतर उत्पन्नाचे साधन नाही. वरीच जमीन बाहेरील लोकांना विकून टाकली आहे. पवसाळा सोडून इतर वेळी गावात दोनदा एस.टी बस येते.काही तरुणांना पूर्वी टाटाने कामावर घेतले होते. पण आता टाटा कोणाला कामावर घेत नाही. लोक कंत्राटी कामावर मजूर म्हणून जातात. गावाखालीच टाटाचे पॉवर हाऊस आहे पण गावाला वीज नाही. गावात कसलीच सोय नाही.मराठी चवथी पर्यंत शाळा आहे. घरे साधी आहेत. दगड विटांचा वापर थोडा आहे. कारवीच्या भिंती करुन त्याला शेणाने सारवून भिंती करण्याचा प्रघात आहे थोड्याफार प्रमाणात दुभती जनावरे असली तरी चार्याचा प्रश्र आहे त्यामुळे तो जोड धंदा होऊ शकत नाही. या गावात एक वैैशिष्ठ्य आढळले ते म्हणजे सोयरिकी गावातल्या गावातच होतात. या गावापासून कोकणातील रायगड जिल्ह्याची हद्द साडेतीन किलोमिटरवर सुरु होते. तेथे कोंडथर हे तालुका माणगाव जिल्हा रायगड मधील गाव लागते. या गावातील घरांची रचना थोडी निराळी आहे. फक्त साडेतीन किलोमिटर अंतर असले तरी हा बदल दिसून येतो.ताम्हणी- अधरवाडी -कोंडथर येथून नवा मोठा महामार्ग तयार करण्याचे काम चालू आहे. हा मार्ग मुंबई गोवा मार्गाला मिळतो. खाली माणगाव तालुक्यात आता एम. आय. डि. सी चे काम चालू आहे. २००१ च्या सुमारास मोठा महामार्ग तयार झाल्याने अाता कोकणात जाणार्या गाड्या जातात. त्यामुळे दर १५/२० मिनीटाला बस जाते. दळणवळणाची साधने वाढली आहेत | ||