Village: भोरकस - Bhorkas
[6] id = 22595 ✓ ढमाले सरु - Dhamale Saru | शेतीच्या बाया शेती रंजील्या गंजील्या भोळ्या माझ्या दत्तूनी भोळ्या भक्तानी पुंजीला śētīcyā bāyā śētī rañjīlyā gañjīlyā bhōḷyā mājhyā dattūnī bhōḷyā bhaktānī puñjīlā | ✎ Deities in the field were displeased with the cultivation of the field (certain things happened against their wishes) My innocent son Dattu, worshipped them with full devotion ▷ (शेतीच्या)(बाया) furrow (रंजील्या)(गंजील्या) ▷ (भोळ्या) my (दत्तूनी)(भोळ्या)(भक्तानी)(पुंजीला) | pas de traduction en français |
Notes => | भूमी ही माता आहे. शेतक-याची जमिनीवर मालकीची भावना नाही. ही जमिन देवतांच्या मालकीची आहे. त्यांची परवानगी घेवूनच शेतकरी शेती करतो. पण शेती करत असताना अनेकदा नजरचुकीने या देवतांना आपल्यामुळे काही त्रास झाला असेल किंवा होण्याची शक्यता आहे या भावनेतून स्री म्हणते की, माझा मुलगा शेती करत असताना शेतीमधील देवतांना त्रास सोसावा लागला. पण माझा मुलगा दत्तू भोळा आहे. त्याच्या पुजनाने कदाचित तुमचे पुर्ण समाधान होणार नाही पण तुम्ही माझ्या मुलाला सांभाळून, समजून घ्या. इथे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणावे लागेल की एक मावली दुस-या मावलीला आपल्या मुलाला सांभाळून घेण्यास सांगत आहे | A farmer does not have a sense of ownership of the land. For him, it belongs to the deities or goddesses. He takes their permission to cultivate the land. But the woman feels that through oversight or unknowingly, it is possible that her son may have harmed their feelings or they may have had to suffer while cultivating the land. She says, ’’My son Dattu is a very simple man. Perhaps his devotion and worship may not have given you complete satisfaction, but please understand him, bear with him.’’ Here, one more thing to be noticed is that one mother is asking the other mother, namely the deities, to take care of her son. |