Cast: न्हावी / Nhavi Village: तव / Tav Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: वरसगाव / Warasgaon Gender: F | वयः ४९ शिक्षणः नाही मुलगेः ३ मुली ः२ व्यवसायः शेती तीन एकर. (या मुळात वरसगाव धरण होण्यापूर्वी त्या भागात रडात होत्या. धरण झाल्यामुळे यांचे पर्नवसन झाले. नवीन जीवन पध्दती स्विकारण्यास पुष्कळच त्रास होतो. मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे येथे. पूर्वी जेवढी शेती होती त्यापेक्षा आता फारच थोडी शेती मिळाली आहे. पूर्वी यांच्या कुटुंबाकडे न्हावी असल्याने बर्याच गावांचे बलुते होते. शिवाय स्वतःची शेती होती. त्यामुळे या वर्षाच धान्य त्या वर्षाला पुरत होते. आता शेतीपण थोडी आहे शिवाय भांडवलाचा मोठा अभाव. त्यामुळे मजुरीवरच भागवावे लागते. मोठा मुलगा मुंबईला होता पण आता अजारी झाल्याने परत आला. शेतीवर म्हणजेच मजुरी करुन खातो. साधारणपणे कोणाची तरुण मुले शेतीवर रहाण्यास तयार नाहीत. गावाकडून लाकडे वगैरे सामान आणले परंतु पूर्वीइतके चांगले बांधता आले नाही. घराची बांधणी मावळ भागासारखी केली आहे.) आईकडून ओव्या शिकल्या. | ||