Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: गणपतीवाडी / Ganapatiwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वयः ३५ वर्षे शिक्षणः ३री ग्रामपंचायत सदस्य मुलगाः १ मुलगीः १ माहेरः इसकर माहेरचे आडनावः बोडके व्यवसायः शेती. दोन एकर शेती असून भात, नाचणी, वरई ही पीके काढतात. ५-६ पोती भात होतो. दोन बैल, ५ कोंबड्या आहेत. नुसत्या शेतीतून पोट भरत नाही. माहेरी चुलती, आई, बहिणीकडे गाण शिकले. मुक्याने दळता येत नाही.जात्यावर बसल की आपोआप गाण येत, आठवत. तस डोक्यात येत नाही. शेतावर एकल बसल की डोक्यात गाण येते. स्वतः गाण रचते. गाण म्हणायला लागले की पोरी -सोरी येतात.त्यांनी गाण शिकाव अस वाटते. वाड-वडिलांच चालत आलेल टिकाव अस वाटत. लेकाहून, भावाहून, देवाहून गाण म्हणायला जास्त आवडते. घरची परिस्थितीः दोन खणाचे मातीच घर आहे. मुलगा रोजगार हमी योजनेवर हजेरी सहायकाचे काम करतो. गरीब डोंगरी संघटनेच्या विविध उपक्रमात भाग घेतो. | ||