Cast: देशमुख / Deshmukh Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F Songs by Sathe Saraswati (124) | वय ः ४० शिक्षणः इ.५वी पास मुलगेः ३ मुलगी ः नाही माहेरः नांदे व्यवसायः शेती २ एकर. ९-१० पोती भात होतो. पीकःतांदूळ, गहू. जोडधंदाः किराणा मालाची छोटीशी टपरी आहे. १ शेळी, कोंबड्या आहेत. लहानपणी आईचे ऐकून ओव्या शिकले. आईवरची, भावावरची गाणी आवडतात. त्या ती गाणी म्हणतात. मुक्याने जात्यावर बसता येत नाही. जात्यावर बसल्यावर माया उफळून येते. मैत्रिणीला शिकवते व तिच्याकडून स्वतःही शिकते. हे डोक्यात कसं राहत ते समजत नाही. ते आपोआपच डोक्यात राहते. जात्यावर बसल्यावर जसे विषय येतील त्या विषयावर गाणी तयार करते. हळदीच्या गळा गंमतीखातर आवाज बदलून मजेत म्हणतात. हळदीसारखा दुसरा गळा इतर वेळी म्हणत नाही. सर्व लोक आवडीने गाणी एकतात. ज्याना गाणे येत नाही त्यांच्यावर टीका करत नाही. त्यांच्या नैसर्गिक बुध्दीवर ते अवलंबून असते. सध्या जाती नाहीत. त्यामुळे आजच्या मुली गाणी म्हणत नाहीत. माझ्या सुनेला गाण्याची आवड/छंद नाही. त्यामुळे सुनेवर लादत नाही. तिला बळजबरीने गाणी म्हणण्यास सांगत नाही. मुळात ती जात्यावर बसतच नाही. विधवा आहेत. घरची पीरस्थिती ः घर ३ खणाचे असून सिमेंटमध्ये पे बांधकाम केलेले आहे. घरात टी.व्ही. , टेप,लाईट आहे. एक मुलगा पुण्याला नोकरीला असून दोन मुले गावात संस्कारवर्ग चालवितात. त्यांचे शिक्षण चालू आहे. एकत्र कुटुब आहे. बाई शेतीची सर्व कामे करतात. घरात कुटुंबप्रमुखाची भूमिका निभवतात. ८-९ वर्षे गरीब डोंगरी संघटनेत सामाजिक कार्य केले असून सध्या सावित्रीबाई फुले महिला संस्था , कोळवण येथे ७-८ वर्षापासून काम करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिसरात त्यांचा प्रभाव आहे. त्या शासनाच्या लोकांसंबंधीच्या योजना राबवितात. तसेच परित्यक्तांच्या संदर्भात वाद मिटवतात. घर एकंदर खाऊन पिऊन सुखी आहे. | ||