Cast: नवबौध्द / Navbaudha Village: पेंडुरे / Pendure Taluka: मालवण / Malvan District: सिंधुदुर्ग / Sindhudurg Gender: F | वयः ७५ माहेरः मालवण सासरः पेंडूर सुलोचनाबाईंच्या चुलत आजीने मरताना यांच्या यजमानांचा हात हातात घेऊन याच घरी रहा असे सांगीतले तेंव्हापासून त्या या मालवणातील बुध्दवाड्यातील घरात रहातात. यांचे यजमान शिक्षक होते. त्या सांगत होत्या की बाबासाहेबांची सभा मालवणला झाली होती तिथे या ओटीत फुले घेऊन गेल्या व ती त्यांनी बाबांच्या पायावर ठेवली. बाबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन सांगितले तू शिक व मुला नातवंडांना शिकव. आज त्यांच्या घरातील सर्वजण शिकले आहेत. दोन्ही नातु शिकून नोकर्यांना आहेत. नात सुना शिक्षिका आहेत. मंडळी शिकलेली आहेत येवढेच पण त्याबरोबर येणारी सुसंस्कृतता मात्र जाणवली नाही. आज या वयात आजींना हेची फळ काय मम तपाला असे म्हणण्याची बहुतेक वेळ येत असावी. आज त्यांना फारशी गाणी आठवत नाहीत. पण अख्खा बु्ध्दवाडा सांगतो की त्याबाई बाबासाहेंवाची गाणी. जात्यावरल्या ओव्या पुष्कळ म्हणत. म्हणजे यांचा गाण्याच्या बाबतीत हात धरणारा कोणी नव्हता. यांची मुलाखत व गाणी ७.२.२००४ ला घेतली. विधवा | ||