Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F | वयः ५० शिक्षणः नाही मुलं ः नाहीत माहेरः भादस व्यवसायः शेती १६ एकर. ३० पोती भात होतो. जोडधंदाः दूध विकणे. माहेरी आईचं,चुलत्यांचं ऐकून गाणं शिकले. सासरी शेजारणीकडून शिकले. हळद दळताना, ऋषीपंचमीला,वरई दळताना गाणे म्हणते. भावाचं, मुलांचं, लेकरांचं, देवाचं गाणं येतं. देवाचं गाण म्हणायला आवडते. आता नवीन गाणं निघलय त्यांच्यात बसायला मला आवडत नाही. माझं जे जुनं आहे त्यांच्यात म्हणायला आवडते. सारख्या बरोबरीच्या बायका असल्या तर गाणं म्हणते. मुक्यांन दळण दळताचं येत नाही. त्यामुळे दळण लवकर संपत . उफळून आल्यावर गाणं म्हणते. कुठं एकटंी शेतावर , बांधावर बसंल की मनातल्या मनात घोळवायचं रचायचं. देवाधर्मीच्या विषयावर गाणं रचते. ज्यांनी शिकवलं त्यांच्या शब्दात बदल करत नाही. सुना म्हणतात आमाला गाणं शिकवा. ज्यांना गाणं येत नाही त्यांनी गाणं माझ्याकडून शिकवून घ्यावा. मला त्यांचा राग येतो. हल्लीची मुलं लक्ष देत नाही. त्यांचं अापल्याला काय करायचं. मी तिकडं लक्षच देत नाही. ऋषीपंचमीला वेगळा गळा वापरतो. तेव्हा देवाविषयीची गाणी म्हणतो. घरची परिस्थिती ः घर ५ खणाचे असून दगडात पक्के बांधकाम केलेले आहे. पाटलाचे घर म्हणून गावात प्रतिष्ठा आहे. घर खटल्याचे असून खाऊनपिऊन सुखी आहे. घरात रेडिओ, टी.व्ही आहे. बाईना पाटलाची बायको म्हणून गावात मान आहे. तसेच त्या घरात थोरल्या असल्याने घरातही त्यांचा वच आहे. | ||