Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: खडकवाडी / Khadakwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Ubhe Durpada (14) ◉ | वयः ६० शिक्षणः नाही मुलगेः ३ मुलीः २ माहेरः येडगाव (सिध्देश्वर) व्यवसायः शेती ४ एकर. २० पोती भात होतो. मुख्य पीकः तांदुळ. उपपीकः नाचणी, गहू. जोडधंदाः कोंबड्या पाळणे. ओव्यांचे गळे माहेरी शिकले. शेजारणीचे ऐकून त्याचा प्रभाव पडला. जात्याचा वापर आता बंद झाला आहे. गिरणीमुळे लग्न समारंभ, सण असेल तरच जाते वापरतात. त्यामुळे मुलींना जात्यावर फारसे बसावे लागत नाही. आम्हीही या मुलींना ओव्या म्हणायची बळजबरी करीत नाही. घरची परिस्थितीः मुले नोकरीस आहेत. वेगळी राहतात.त्यामुळे सध्या घरात नवरा बायको दोघेच राहतात. घर मातीचे बांधलेले, छोटेसे. दोन सुना आहेत.करणारे कोणी नाही. त्यामुळे शेत दुसर्याला वाट्याने करण्यास देतात. बेताची आर्थिक परिस्थिती जाणवली. | ||