Cast: नवबौध्द / Navbaudha Village: खेर्डा बु. / Kherda Bk Taluka: जळगाव जाणुर / Jalgaon Janur District: बुलढाणा / Buldhana Gender: F | वयः४५ सवाष्ण घरची परिस्थितीः मजुरी करतात. गोकर्णाबाईंच्या पुतणीच्या सासुबाई. ही सर्व मंडळी एकत्रच आली होती. यांचा नवरापण बरोबर होता. त्याला पण आपल्या बायकोच्या ओव्या कुणीतरी लिहून घेतात याचे अप्रुप वाटत होते. तो आपल्या बायकोला प्रोत्साहन देत होते.यांना पुष्कळ ओव्या येत होत्या. नुसत्या आंबेडकरांवरीलच नव्हे तर इतर पण ओव्या येत होत्या. यांच्या ओव्या व मुलाखत आम्ही नागपूर येथे २५.१०.२००१ ला दिक्षा भूमीवर घेतली. | ||