Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: सातपूर / Satpur Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वयः८० विधवा तरूणपणी शेतमजुरी करत असत घरची परिस्थितीः परिस्थिती चांगली आहे. गाणी देण्याची उत्सुकता होती. आठवून आठवून सांगत होत्या. गाण आडल तर म्हणत की पुढल रचा की आपल्याला काय रचता येत नाही का? त्या सांगत होत्या की पूर्वी लग्नासाठी मुंबईस गेलो होतो. अाम्ही पारंपारिक लग्नाच्या जात्यावरच्या ओव्या म्हणत होतो. पण त्या बाया म्हणाल्या की बाबासाहेबात नाव घालून म्हणा. आम्ही निघालो तेंव्हा म्हणाल्या की ही बाई ब्राह्मणाची आहे. ही ब्राह्मण माणस मदत करतात. आपल्यासारखी दुस्वासी नाहीत. यांनी बाबासाहेवांवर चांगली पुस्तके लिहीली, नाटक लिहीले, सिनेमा काढला. पुष्कळ उपकार केले. आता ही बाई बाबासाहेबाची गाणी लिहून ठेवते तर तिला मदत करायला हवी. सातपुर हा नाशीकचा भाग. पूर्वी नाशीकच्या शेजारी खेडे होते. आता नाशीक महानगरपालिकेत आले आहे. यांच्याकडे ११.९.२००१ ला जाऊन ओव्या गोळा केल्या. | ||