Cast: फुलमाळी / Phulmali Village: लाखनवाडी / Lakhanvadi Taluka: चांदूर बाझार / Chandur Bazar District: अमरावती / Amravati Gender: F | वयः ३६ मुलगेः २ मुलगी २ सवाष्ण व्यवसायः शेती बागायत शेती, ऊस कापूस होतो. घरची परिस्थिती ः उत्तम आहे. जावे बरोबर आल्या. नवरा घरीच थांबला. या स्वतः ८वी पर्यंत शिकल्या. गावात शाळा नव्हती म्हणून पुढचे शिक्षण घेता आले नाही. मग लग्न झाले. एका मुलाला १० वी केले. मुलगी ६वीत आहे. धाकटा तिसरीत आहे. त्या गुलावराव महाराजांच्या शिष्या आहेत व त्यांच्याच दिंडीत चालत आल्या. संत जनाबाई शाळेत उतरल्या होत्या. त्यांना पंढरपूरला येण्यासाठी महीनाभर चालावे लागले. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||