Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: कन्नड / Kannad District: औरंगाबाद / Aurangabad Gender: F | वयः५० मूल नाही विधवा शेती नाही घरची परिस्थितीः नवर्याने दुसरे लग्न केले नव्हते. नवर्यावर गाणी सांगू लागल्या व त्यांना रडू आवरले नाही. मग गाणी सांगवेनात. नवरा असतानाच दिरातून वेगळ्या झाल्या होत्या. नवरा मजुरी करायचा. यापण मजुरी करायच्या. आज सुध्दा मजुरी करूनच पोट भरतात. त्यातूनच चार आठ आणे मागे टाकून वारीला येतात. मूल होण्यासाठी डॉक्टर केले. पण उपयोग झाला नाही. या गंगागीर महाराजांच्या शिष्या आहेत. त्यांच्याच मठात त्या राहील्या होत्या. त्यांच्या शिष्यांना ५० रू भरले की वारीत येता येते. वरीतील सर्व सोयी उपलब्ध होतात. जेवण, चहा, नाश्ता, उतरण्याची सोय हे सर्व मिळते. त्या दिंडीबरोबर चालत आल्या होत्या. पण दोन दिवस आधी पंढरपूरला आल्या, व विठ्ठलाचे दर्शन घेतले. तरी सूध्दा रांगेत सात तास उभे रहावे लागले. दळणाचा सराव होता म्हणून पुष्कळ गाणी लक्षात आहेत. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली. | ||