Warning: Undefined variable $performer_picture_url in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 318
Cast: मराठा / Maratha Warning: Undefined variable $village_devanagari in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Warning: Undefined variable $village in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Village: / Taluka: कन्नड / Kannad District: औरंगाबाद / Aurangabad Gender: | वयः५० मूल नाही शेतीः नाही घरची परिस्थितीः आज नवरा नाही. पण जिवंत असताना जे सुख मिळाल, ज्या चांगल्या आठवणी होत्या त्यावर गाणी म्हणा अशी विनंती साठेबाईंनी केली तर म्हणाल्या की काही सुखच मिळाल नाही तर काय गाणी गायची. हळद लागली अन् नवरा गेला. जन्मभर मजुरी करून पोट भरल. आज सुध्दा मजुरी करूनच पोट भरतात. त्यातूनच चार आठ आणे मागे टाकून वारीला येतात. त्या म्हणाल्या मला पुष्कळ हुषारी आहे. जर शिक्षण असते तर कशाला खुरपत बसले असते. नोकरीच केली असती. (एकूण परिस्थितीचा राग आहे त्यांच्या मनात) विधवा या गंगागीर महाराजांच्या शिष्या आहेत. त्यांच्याच मठात त्या राहील्या होत्या. त्यांच्या शिष्यांना ५० रू. भरले की वारीत येता येते. वरीतील सर्व सोयी उपलब्ध होतात. जेवण, चहा, नाश्ता, उतरण्याची सोय हे सर्व मिळते. त्या दिंडीबरोबर चालत आल्या होत्या. पण दोन दिवस आधी पंढरपूरला आल्या, व विठ्ठलाचे दर्शन घेतले. तरी सूध्दा रांगेत सात तास उभे रहावे लागले. दळणाचा सराव होता म्हणून पुष्कळ गाणी लक्षात आहेत. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली. | ||