Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मोशी / Moshi District: अमरावती / Amravati Gender: F | वयः ७० मुलगेः २ मुलीः २ सवाष्ण, व्यवसाय ः शेती तीन एकर कोरडवाहु. त्यात फारसे काही पिकत नाही. त्याम्हणाल्या की आयुष्यभर मजुरीच केली. गाणी पुष्कळ येतात कारण घरी गरीवी, मोठा सासुरवास त्यामुळे नित्यनेमाने दळावे लागे. सासुरवासाच दुःख कोणाला सांगणार तर जात्याच्या दगडालाच. या दगडापाशीच मन मोकळ करायच. या गुलाबराव महाराजांच्या दिंडीत आल्या होत्या. संत जनाबाई कन्याशाळा येथे उतरल्या होत्या. अमरावतीहून येण्यास बरोबर एक महीना लागला. २७ मेला निघाल्या त्या २५ तारखेस रात्री पंढरपूरला पोहोचल्या. म्हातारपणामुळे एवढे चालल्यावर पाय दुखत होते. दमल्यासारखे झाले होते.या बाईंना पुष्कळ गाणी येत होती. देण्याचा उत्साह वाटत होता. मी (हेमा राईरकर) शाळेच्या बाहेर बसले होते तिथे दिंडीतला एक तरूण बसला होता. त्याला बायांनी गाणी द्यावीत असा उत्साह वाटत होता. त्यांनी जनावाईंना शाळेतून बोलावून आणले व गाणी देण्याची विनंती केली. तो तरूण पूर्ण वेळ तिथे वसून होता. एवढेच नाही तर रात्री गाणी टेप करण्यास गेल्यावर त्यांने जनाबई व इतरांना बोलावून आणले. यांचा आवाज चांगला होता. सायंकाळी गाणी टेप करण्यासाठी येऊ असे सांगितल्यावर त्या आनंदाने तयार झाल्या. मंदुराबाई चोंधे यांना महाराजांची भीती वाटत होती. चोंधे म्हणत होत्या की टेप घेऊन येऊ नका. पण यांनी फिरफिरून टेप आणण्या बद्दल सांगीतले. यांच्या मते जात्यावरची गाणी देण्यात कसली भीती. रात्री टेप नेल्यावर यांनी गाणी गायली. रात्री आम्ही गेलो तेंव्हा बाया महाराजांना म्हणु लागल्या की आम्ही जात्यावरची गाणी सांगीतली ही आमची चूक झाली. जनाबाईंनी महाराजांना सांगीतले की जात्यावरची गाणी दिली यात मला चूक वाटत नाही. माझ्या मनावर दबाव आला नाही. ही आमची गाणी आहेत. आम्ही गयली आहेत. ती देण्यात आम्हाला आनंद वाटला. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||