Database design: Bernard Bel
https://ccrss.org/database/performer.php?performer_id
= 2401
[Login]

Project  ♪♪ सांगते बाई तुला - Sāṅgatē bāī tulā - I tell you woman! ♪♪

Read project statement
With the support of People’s Archive of Rural India (PARI)
Source documents produced by GDS / CCRSS
Devanagari to Diacritic Roman conversions with TechWelkin

Creative Commons
CC license

grindmill.org

  Recordings: recordings.php
 • Performers: performer.php
 • Locations: villages.php
 • Classification: classification.php
 • Groups: groups.php
 • Glossary: glossary.php
 ⚲ Search: search.php


Grindmill songs of Maharashtra — Performer
“Adhau Meera”
1 record(s)
 
 

[2401]
आढावू मीरा
Adhau Meera


Cast: मराठा / Maratha
Village: /
Taluka: मोशी / Moshi
District: अमरावती / Amravati
Gender: F

Songs by Adhau Meera (4)

वयः ६५ सवाष्ण

या गुलाबराव महाराजांच्या दिंडीत आल्या होत्या. संत जनाबाई कन्याशाळा येथे उतरल्या होत्या.
या बाईंना पुष्कळ गाणी येत होती. देण्याचा उत्साह वाटत होता. मी (हेमा राईरकर) शाळेच्या बाहेर बसले होते तिथे काही बाया गाणी देत होत्या. तिथे या आल्या व स्वतःहून मोठ्या उत्साहानी गाणी दिली.
यांनी सांगीतले की अष्टापुरला मंगळादेवीची यात्रा भरते.
यांचा आवाज चांगला होता. सायंकाळी गाणी टेप करण्यासाठी येऊ असे सांगीतल्यावर त्या आनंदाने तयार झाल्या. मंदुराबाई चोंधे यांना महाराजांची भीती वाटत होती. चोंधे म्हणत होत्या की टेप घेऊन येऊ नका. पण यांनी फिरफिरून टेप आणण्या बद्दल सांगीतले. यांच्या मते जात्यावरची गाणी देण्यात कसली भीती. रात्री टेप नेल्यावर यांनी गाणी गायली.ली.
यांना मंगळादेवीची गाणी येतात. त्यांनी यात्रा बघण्यासाठी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले.
आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली.