Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: चांदूर बाझार / Chandur Bazar District: अमरावती / Amravati Gender: F | वयः ६५ या गुलाबराव महाराजांच्या दिंडीत आल्या होत्या. संत जनाबाई कन्याशाळा येथे उतरल्या होत्या. या बाईंना पुष्कळ गाणी येत होती. देण्याचा उत्साह वाटत होता. पण काही पुरूषमाणसांनी दबाव आणला. दिंडीत आलेल्या बायांनी गाणी द्यावीत याबाबत गुलाबराव महाराजांचा अमरावतीत जो मठ आहे तिथे काम करणार्या एक महीला व काही पुरूष यांनी जास्त प्रमाणात नाराजी व्यक्त केली. त्यांची नाराजी पाहून बायांनी गाणी देणे बंद केले. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||