Cast: मराठा / Maratha Village: वडगाव / Vadgaon Taluka: कळम / Kalam District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ३५ मुलगा ः नाही मुली ः २ व्यवसाय ः शेती .घरच्या शेतात काम करतात. या परित्यक्ता आहेत. माहेरी रहातात. मुली यांच्याच जवळ असतात. माहेरी शेती आहे. शेतीत चांगले भागते. यांनी आईवर पुष्कळ ओव्या दिल्या. वडलांचा महीमा सांगणार्या ओव्या दिल्या. आईबापांचा आधार वाटतो. ही भावना जास्त प्रमाणात अभिव्यक्त होत होती. या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती. | ||